HW News Marathi
राजकारण

मुंबईत काय सुरू आहे !

मुंबई | देशाची आर्थिक राजधान मुंबई शहरात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. भिमा-कोरेगाव हिंसाचारानंतर मुंबईत बंद असो, मराठा क्रांती आंदोलनातील काही हिंसक घटना आणि आमदार तुकाराम काते यांच्यावरील हल्ला असो या घडत आहेत. आणि मुंबई पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतात. नुकतेच दादरच्या फूल मार्केटसारख्या गजबलेल्या भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या झाली. या सर्व घटानांनी मुंबईत सध्या काय सुरू आहे? असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून केला आहे.

 

सामनाचे आजचे संपादकीय

सत्ताधारी पक्षाचे आमदार लेकी-सुनांना पळवून न्यायची भाषा करतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळते, पण ‘मेट्रो’च्या झुंडशाहीवर जाब विचारणार्‍या आमदार कातेंवर खुनी हल्ला होतो. अर्थात गुंड व गुन्हेगारांना घेऊन जे पक्ष विस्तार करीत आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची ही सुरुवात आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा व पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे. त्याचा परिणाम नागपुरात व आता मुंबईतही दिसत आहे. राज्याच्या भवितव्यासाठी हे चित्र चांगले नाही.

मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे सरकार मान्य करणार नाही, पण मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचे काही बरे चाललेले नाही. भीमा-कोरेगाव दंगल व त्यानंतर पुकारलेल्या ‘बंद’मध्ये प्रचंड हिंसाचार झाला. पोलिसांनी त्यावेळी बघ्याची भूमिका घेतली. मध्यंतरी झालेल्या मराठा क्रांती आंदोलनातही काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. आता मुंबईत दिवसाढवळ्या खून व हिंसक हल्ले सुरू झाले आहेत. मुंबईत मानखुर्दचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर समाजकंटकांनी खुनी हल्ला केला. त्यातून ते थोडक्यात बचावले, पण रक्त सांडले आहे. त्याचवेळी दादरच्या फूल मार्केट या गजबजलेल्या भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या झाली. असे प्रकार गेल्या दोन महिन्यांत वाढीस लागले तरी सर्व काही आलबेल असल्याच्या थाटात कारभार हाकला जात आहे. महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक गुन्हे उपराजधानी नागपुरात घडत आहेत. खून, अपहरण, खंडणी, बलात्कार अशा घटनांनी नागपूरच्या प्रतिमेस तडे गेले आहेत. सध्या राजशकट मुंबईपेक्षा नागपुरातूनच हलत आहे. मुख्यमंत्र्यांसह अर्धे सरकार हे नागपूर-विदर्भातले. याचा ‘आधार’ गुंडापुंडांना वाटत असला तरी हे चित्र बरे नाही व हेच लोण आता मुंबईकडे पसरू लागले आहे. रोजच घडणार्‍या घटनांनी

मुंबईकरांची झोप उडाली

आहे. ज्या प्रकारे गुंड मोकाट सुटले आहेत ते धक्कादायक आहे. कोणी कितीही बोंबा मारल्या तरी मुंबई हे आजही सगळ्यात सुरक्षित शहर मानले जाते. पोलिसांचा दरारा व कायद्याचा धाक असल्यानेच मुंबई सुरक्षित राहिली, पण गेल्या दोन-चार वर्षांत मुंबईची जास्त वाट लागली आहे. सर्वच बाबतीत मुंबईवर जे अधिकारी लादले गेले ते फक्त ओरबडण्यासाठी व वाट लावण्यासाठीच. कमवा आणि शिका या उक्तीप्रमाणे ओरबाडा, स्वतःच्या खिशात घाला व आमच्याही झोळीत टाका हा नवा ‘समृद्धी मार्ग’ सर्वच सरकारी खात्यांत सुरू झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर मुंबईचा विकास, भलेपणाही संपला. मुंबई-महाराष्ट्राशी वर्षानुवर्षे संपर्क नसलेल्या अधिकार्‍यांच्या हाती राज्य देणे हा जनतेच्या जिवाशी खेळ आहे. पंतप्रधान मोदींच्या जिवास धोका असल्याची गुप्त वार्ता आमच्या पोलिसांना समजते, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे ‘बॉम्ब’ ठेवल्याची माहिती मिळते, पण आमदारावर हल्ले होणार आहेत किंवा रस्त्यावर कुणाला गोळ्या घालणार आहेत हे पोलिसांना कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. मुंबईत सध्या ‘मेट्रो’ची वारेमाप कामे काढली आहेत. हे सर्व ठेकेदार नागपुरातूनच मागवले आहेत असा अनेकांचा दावा आहे. त्यांना वरून आशीर्वाद असल्याने संपूर्ण मुंबईत त्यांचा

हवा तसा उत्पात

सुरू आहे. येथील लोकांच्या पोटापाण्यावरून, घरादारांवरून ‘मेट्रो’रूपी नांगर फिरवले जात आहेत व त्यांना जाब विचारणार्‍या तुकाराम कातेंसारख्या आमदारांवर ते हल्ले करीत आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीत ही नवी विकृती वाढू लागली तर मुंबईची पुरती वाट लागल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार लेकी-सुनांना पळवून न्यायची भाषा करतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळते, पण ‘मेट्रो’च्या झुंडशाहीवर जाब विचारणार्‍या आमदार कातेंवर खुनी हल्ला होतो. आमचे रक्त सांडून तुमचे खिसे भरणारा ठेकेदारी संस्कृतीचा विळखा महाराष्ट्राच्या सरकारला पडला आहे. अर्थात गुंड व गुन्हेगारांना घेऊन जे पक्ष विस्तार करीत आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? गुंडापुंडांना लोकप्रतिनिधी केले व पक्ष विस्तारास आर्थिक हातभार लावणार्‍यांना पोलीस, महसूल, बांधकाम विभागात मोठ्या पदांवर लादले की असेच व्हायचे. शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची ही सुरुवात आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. मंत्रालयातून राज्य करणे कमी व पक्ष विस्ताराचे काम जास्त होत आहे. पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा व पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे. त्याचा परिणाम नागपुरात व आता मुंबईतही दिसत आहे. राज्याच्या भवितव्यासाठी हे चित्र चांगले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकाकी लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

News Desk

अंधारे आणि दानवेंनी घेतली राऊतांची भेट; तर अफजल खानच्या कबरीसंदर्भात बोलताना, म्हणाले…

Darrell Miranda

अमित शहांनी घेतले सिद्धिविनायक दर्शन

swarit