HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीला राम राम ठोकणार ?

सोलापूर | राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले रणजितसिंह मोहिते-पाटील आता राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपला साथ देणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आतापर्यंत जाहीर केलेल्या दोन उमेदवार याद्यांमध्ये माढा मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे माढाचा तिढा अद्याप कायम असल्याचे चित्र स्पष्ट आहे. दरम्यान, आज (१९ मार्च) अकलूजमध्ये मोहिते-पाटील समर्थकांची बैठक होणार असून या बैठकीनंतरच मोहिते-पाटील आपली पुढची दिशा ठरवतील अशी माहिती मिळत आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोमवारी (१८ मार्च) रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना माढ्यातून उमेदवारी देण्यास सकारात्मक असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या संकल्प पत्रात छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी ६० वर्षांनंतर पेन्शन

News Desk

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांबाबत मवाळ तर विरोधकांबाबत कठोर भूमिका घेते !

News Desk

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk