HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : भाजपमधून बाहेर पडणे वेदनादायी !

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांना पटना साहिबमधून तिकीट नाकारल्यानंतर भाजपकडून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना पटना साहिबमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले शत्रुघ्न सिन्हा हे लवकरच भाजपमधून बाहेर पडून काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा उघडपणे भाजपवर नाराजी व्यक्त करीत काँग्रेसचे कौतुक केले आहे. यंदा आपण काँग्रेसकडून निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे. त्याचप्रमाणे, भाजपमधून बाहेर पडणे मोठे वेदनादायी असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

“भाजपमधून बाहेर पडणे हे वेदनादायी आहे. मात्र, मी अशी आशा करतो कि माझे प्रिय लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्त्वाने आणि नेहरू-गांधी परिवारात लोकप्रिय नेत्याच्या (राहुल गांधी) मार्गदर्शनातून जाणार आहे. देश निर्माण करणारे सच्चे कुटुंब”, अशा आशयाचे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.  शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी (२८ मार्च) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे बिहारमधील प्रमुख नेते शक्ती सिंग गोहील यांनी सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सिन्हा हे काँग्रेसचे स्टार प्रचारक देखील असणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

अवनी वाघिणीच्या क्रूर हत्येमुळे मला दुःख झाले !

Shweta Khamkar

प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्या, काँग्रेसची मागणी

News Desk

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे विधानभवनाबाहेर आंदोलन

News Desk