HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीकडून सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आघाडीकडे वर्ध्यासह बुलढाणा आणि हातकणंगले या तीन जागांची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सांगलीच्या जागेसाठी देखील आग्रही होती.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येडं पेरलं अन् खुळं उगवलं, धनंजय मुंडेंची दानवेंवर जहरी टीका

News Desk

यंदा काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका !

News Desk

“ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे”, उद्धव ठाकरेंची मागणी

Aprna