HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : आज प्रकाश आंबेडकर सोलापूरातून भरणार उमेदवारी अर्ज

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे आगामी लाेकसभा निवडणूक लढणार आहे. प्रकाश आंबेडकर हे सोमवारी (२५ मार्च) सकाळी ११ वाजता साेलापूर येथून लाेकसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. साेलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर, काॅंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

माझी भारिप बहुजन महासंघाशी जरी भावनिक नाते असले तरी पुढची वाटचाल ही वंचित बहुजन आघाडीतून करणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असून त्यापुढील सर्व निवडणुका वंचित आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते.

“राज्यात वंचितांना सोबत घेतल्याशिवाय कुणीही सत्तेत येऊ शकणार नाही हे काँग्रेस जाणते. आम्ही जुलैमध्येच काँग्रेसला १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी त्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. आम्ही आता २२ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता आम्ही मागे हटणार नाही”, असे काहीच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनच टाळाटाळ होत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते.

Related posts

महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेची ही घसरण आहे !

News Desk

बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले म्हणून चक्क स्वतःचे बोटच कापले

News Desk

देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग फसला म्हणून मोदींनी पत्रकार परिषद घेतली !

News Desk