HW News Marathi
राजकारण

जनसंपर्क वाढविण्यासाठी शहांनी घेतली माधुरीची भेट

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज दुपारी १२ वाजता मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. रंगशारदेतील बैठक आटपून अमित शहा माधुरीच्या घरी दाखल झाले. यावेळी अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते. ‘संपर्क फॉर समर्थन’ अशी मोहीम अमित शाह यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अमित शाह मुंबईतील विविध प्रसिद्ध व्यक्तींना भेटणार आहेत.

अमित शाह यांच्या उपस्थितीत रंगशारदा येथे भाजपची महत्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित होते. अध्यक्ष अमित शहा यांचा संपर्क अभियानाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा उल्लेख नाही. अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. पण अमित शहा-उद्धव ठाकरेंच्या आजच्या भेटीत कुठलाही बदल नाही, भेट निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपाची पिछेहाट झाल्यावर चार वर्षांनंतर अमित शहा आज सायंकाळी ७.३० वाजता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या कार्यक्रमपत्रिकेत ‘मातोश्री’वरील भेटीचा उल्लेखच नाही. दरम्यान, दुपारी १२.३० वाजता अभिनेत्री माधुरी दीक्षित, दुपारी ४.३० वाजता प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, संध्या. ५.३० वाजता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही अमित शहा ‘संपर्क अभियानातंर्गत’ त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटणार आहेत. .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युती करायची की नाही हे जनता ठरवेल !

News Desk

भाजप म्हणजे खडसेंसाठी जीना यहाँ, मरना यहाँ

News Desk

“…अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले”, उद्धव ठाकरेंचा भगतसिंग कोश्यारींना टोला

Aprna