मुंबई | काँग्रेस मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी जैन समाजाला भडकविण्याचा प्रयत्न करणारे विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पत्र एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याला करण्यात आला आहे. झवेरी बाजार येथे ४ एप्रिल रोजी प्रथमदर्शनी निदर्शनास व्यापारांशी संवाद साधताना मिलिंद देवरा म्हणाले होते.
Maharashtra: EC files complaint against Milind Deora for violating MCC
Read @ANI Story| https://t.co/hH3NUTe2Fz pic.twitter.com/XfvBG4FRS9
— ANI Digital (@ani_digital) April 19, 2019
“शिवसेनेने काही वर्षांपूर्वी पर्युषण काळात जैन मंदिरासमोर मांसाहार शिजवत जैन धर्माचा अपमान केला होता. ही घटना तुम्ही विसरता कामा नये. आगामी निवडणुकांमध्ये मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेला धडा शिकवा”, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केले आहे. देवरा यांच्या भाषण तपासल्यानंतर प्रथमदर्शनी मिलिंद देवरा यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सूचना निवडणूक आयोगाने पालिसांना दिल्या आहेत.
मिलिंद देवरा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा जैन कार्डचा वापर काँग्रेस करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून अरविंद सावंत निवडणुकीच्या रंगणात उतरले आहेत. दक्षिण मुंबईत जैन समाजाची मते महत्त्वाची आहेत. त्यामुळे जैन मते काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी प्रक्षोभक विधान करुन मते मिळविण्याचा केविळवाणा प्रयत्न केल्याचे शिवसेनेकडून आरोप होत होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.