June 26, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पुकारला बंद, वाहतूक विस्कळीत

गडचिरोली | नक्षलवाद्यांनी आज (१९ मे) बंद पुकारलेल्या आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गडचिरोलीमधील काही भागत वाहतूक बंद पडली आहे. नक्षलवाद्यांनी एटापल्ली आलापल्ली मार्गावर झाडे आडवी टाकून मार्ग बंद पाडला आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील बससेवाही बंद आहे.

गुरुपल्लीजवळ वनविभागाची लाखो रुपयांची लाकडेही नक्षल्यांनी जाळली आहेत.  रामको आणि शिल्पा यांच्या चकमकीत २७ एप्रिल रोजी मृत्युच्या निषेधार्थ आज गडचिरोली बंद माओवाद्यांनी घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर जाळपोळ आणि ठिकठिकाणी पत्रके, फलक लावून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले. पोलिसांनी अलर्ट जारी केला असून नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related posts

RamMandir : अयोध्येतील व्यापाऱ्यांच्या विरोधाची तलवार म्यान

News Desk

अयोध्येत गेल्याने त्या दोघांना ‘राम’ पावले असावेत !

News Desk

मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखतं ?

News Desk