HW News Marathi
राजकारण

पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही; चर्चेला उधाण

मुंबई | राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी धीरज लिंगाडे यांनी शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अमरावती निवडणुकीत धीरज लिंगाडे यांच्या विरोधात भाजपचे माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या विरोधात सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार धीरज लिंगाडे यांचे अमरावतील बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे बॅनरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो नाही. यामुळे बॅनर व्हायरल होत असून या बॅनमध्ये राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.

अमरावतीमध्ये महाविकासआघाडीचे बॅनरमध्ये लावण्यात आले आहे. यात बॅनरमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. परंतु,  या बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे फोटो नसल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. पण, हा बॅनर अमरावतीमध्ये हा बॅनर कुठे लागला आहे, हे यांची माहिती मिळू शकली नाही.

बॅनरमध्ये नेमके काय लिहिले

या बॅनरमध्ये  काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. या फोटोखाली अमरावती पदवीधर मतदार संघ 2023, या मंकूराखाली महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे चिन्ह आहे. त्याखाली “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे यांनाच प्रथम पसंतीचे मत देऊन बहुमताने विजय करा!, असा मंजकूर लिहिला आहे. या बॅनरमध्ये 30 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पदवीधराकांचा विकासासाठी आग्रही आणि अग्रणी…” , असा मंचकूर केला आहे.

 

 

Related posts

पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आझाद यांचा आरोप

News Desk

मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

Aprna

राज्यात येणार ते युतीचेच सरकार !

News Desk