HW News Marathi
राजकारण

ममता ‘बंगालदुर्गा’ तर पंतप्रधान मोदी ‘महिषासुर’ !

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महिषासुराशी केली आहे. “देशात शांती आणि समृद्धी आणण्यासाठी ‘बंगालदुर्गेला’ (पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) दिल्लीतील महिषासुराला (पंतप्रधान मोदी) हरवावे लागेल”, असे विधान चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. दरम्यान, नायडू यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. “आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री हे मानसिक रुग्ण आहे. निवडणुकांमध्ये आपला पराभव होईल या भीतीने ते अशा प्रकारची विधाने देत आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी या गेल्या अनेक दिवसांपासून भाजपसह पंतप्रधान मोदींविरुद्ध उघडपणे अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेताना दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक,” अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Aprna

लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करतात !

News Desk

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही !

News Desk