HW News Marathi
राजकारण

मनोहर भिडे यांच्या जाहीर मेळाव्यासाठी परवानगी नामंजूर करण्याची मागणी

भीमा कोरेगांव हिंसेप्रकरणी आम आदमी पार्टीने आरोपी मनोहर भिडे यांच्या जाहीर मेळाव्यासाठी परवानगी नामंजूर करण्याची मागणी केली आहे.
भीमराव कोरेगांव लढाई च्या बलिदानाची 200 वी वर्षगाठ साजरी करणाऱ्या दलितांवर महाराष्ट्रातील नव्या वर्षात जीवघेणा हल्ला करण्यात आला. दरवर्षी शांततेत हा उत्सव साजरा होतो, परंतु यावर्षी आंबेडकरी अनुयायांवर भगवे झेंडेधारकांद्वारे कथितरित्या हल्ला करण्यात आला.
मनोहर भिडे हे असे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्यावर हिंसा भडकावण्याच्या आरोपावरून (त्यातून एका व्यक्तीचा जीव गेला) पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्राच्या शांतताप्रेमी नागरिकांनी अशी मागणी केली की, द्वेष पासरविण्याऱ्या व्यक्तीला शहरातील संवेदनशील परिस्थितीचा व संबंधितांविरोधातील दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा विचार करीत मुंबईतील सार्वजनिक सभेस संबोधित करण्याची परवानगी नाकारण्यात यावी.आमच्या राजधानी मुंबई शहरात त्याची उपस्थिती अनावश्यक व अप्रसंगीक आहे.
आम्ही अशी मागणी करतो की त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी रद्द केली जावी आणि त्यांना मुंबईतील प्रवेशाच्या कायद्यातील कलमांतर्गत प्रवेश करण्यास मनाई करण्यात यावी आणि त्यांना मुक्तपणे हलचालीस परवानगी न देता ताबडतोब अटक करण्यात यावी.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

swarit

शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Aprna

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk