HW News Marathi
राजकारण

“महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जातात”, भुजबळांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई | “सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे”,  ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
“महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दिल्लीत आपल वजन वापरून यापुढे तरी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून देशाचे नेते हे संपूर्ण राष्ट्राचे नेते आहे. त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये,” असा टोला छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला.
“मुख्यमंत्र्यांनी मंडळ, दंही हंडी, राजकीय भेटी आणि…”, आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप
“आपले मुख्यमंत्री मंडळ, दंही हंडी मग नंतर राजकीय भेटी आणि फोडाफोडी हे सोडून दुसरे काहीही केले नाही”, असा गंभीर आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टाटा एयरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावर केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “आता जर आपण बघितले, तर आपले मुख्यमंत्री मंडळ, दंहीहांडी. यानंतर राजकीय भेटी आणि फोडाफोडी हे सोडून दुसरे काहीही केले नाही. जसे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आपल्या राज्यात आले. तर ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आपल्या राज्यात आले. इथल्या उद्योजकांची चर्चा केली. तसेच गेल्या तीन महिन्यामध्ये मला तुम्ही एक गोष्ट सांगा की, आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन असे कुठचे काही केले आहे, कुठेही नाही केले,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “जे उद्योग आपल्या राज्यात आहेत. ते सुद्धा राज्याबाहेर निघून जात आहेत. आपण बघितले असे की या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही. म्हणून प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येणार होता. प्रत्येक गुंणतवणुकी जी आपल्या राज्यात येणार होती. ती आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहे.”

Related posts

शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे जीवा शिवाची जोडी

News Desk

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ; 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते | नरेंद्र मोदी

News Desk