HW News Marathi
राजकारण

“खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका

मुंबई | “या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही”, अशी बोचरी टीका शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ‘टाटा एयरबस प्रकल्प’च्या (Tata Airbus Project) मुद्यावरून केली आहे. राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग्ज पार्क हे दोन महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यानंतर सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ राज्यातून महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आज (28 ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर ‘टाटा एयरबस’ प्रकल्पाच्या मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले.

आदित्य ठाकरे म्हणाले, “कुठे ना कुठे जग जाहीर होते की, या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही. यात मग तुमचा ना, माझा आणि ना उद्योजकांचा आहे. राज्यात अस्थिरता निर्माण झाल्यामुळे काय होणार, निवडणुकीला सामोरे जाण्यास कोणी तयार नाही. तो राज्यात गुंतवणूक काय आणू शकतो.” असा निशाणा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधला

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा अधिकाऱ्याला दारू पिता का?, असा प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यासंदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “ठिक आहे ना, मी त्यांच्याबरोबर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जे विचारले. कदाचित मी करत नाही, म्हणून त्यांना वाईट वाटत असेल. पण, तुम्ही बघा काल खाते वाटप वेगळा झाले. खाते वाटपात फेरफार झाले आहेत. काल उद्योग मंत्र्यांनी शेतीबद्दल ट्वीट केले आहे. कृषी मंत्र्यांनी एक्साईच्या विषयाला हात घातला. आणि कृषी मंत्री कोण आहेत. जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारले. तेव्हा त्या बिचाऱ्यांना माहिती नव्हते की राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत. कारण, शेतीच्या बांधावर कोण आले नाहीत. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहिती नाही. आणि आशा परिस्थिती महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय, हा विषय महत्वाचा आहे.

50 खोके दिले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती

जर 50 कोटी दिले असतील तर त्यांची ईडी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरे विचारल्यावर ते म्हणाले, “काय आहे की, हे सर्व राजीनामा देतील आणि बाहेर पडतील. तेव्हाच आम्ही विश्वास ठेवू शकतो, पण 50 खोके, हे महाराष्ट्राला माहिती आहेत आणि हे जग जाहीर झालेले आहेत. आणि आता तेलंगणामध्ये देखील हा प्रकार सुरू झालेला आहे.”

 

Related posts

स्वाभिमानी-आघाडीच्या नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक

News Desk

मोदी – फडणवीस हत्येचा कट ही केवळ अफवा

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर आमदार कैलास पाटलांचे उपोषण मागे

Aprna