HW News Marathi
राजकारण

मराठा समाज राज्य सरकारवर नाराज, पुढील निर्णयासाठी घेणार बैठक

मुंबई | “मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर राज्य शासनानेच सर्व शासकीय विभागांना मराठा आरक्षणातून नियुक्ती न करण्याचे आदेश दिले आहेत. या छुप्या आदेशाद्वारे सरकारने कुटनीतीने मराठा समाजाची मोठी फसवणूक केली”, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला असून सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (६ मार्च) यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मराठा समाजाची पुढची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या या बैठकीत मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. सरकारने आश्वासन देऊनही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्याचप्रमाणे आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबालाही अद्याप मदत मिळालेली नसल्याने मराठा समाज प्रचंड नाराज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करणार

Aprna

“खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका

Aprna

#LokSabhaElections2019 : भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार !

News Desk