HW Marathi
राजकारण

#MarathaReservation : आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. दरम्यान, १० डिसेंबरपर्यंत या याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. सोमवारी (१० डिसेंबर) अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेसह यासंदर्भातील अन्य याचिका देखील निकाली काढण्यात येतील.

या सर्व याचिकांवरील सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. आज मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात रिट याचिका दाखल करणाऱ्या अॅड.जयश्री पाटील यांचे वकील अॅड.गुणरत्न सदावर्ते आज न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, दुपारी ३ वाजता न्यायालयाने यावरील सुनावणी पूर्ण केली.

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आला आहे. दरम्यान, परंतु तरीही कोणत्याही संस्था, संघटनकडून न्यायालयात या आरक्षणाविरोधात आव्हान याचिका दाखल केली जाऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सोमवारी (३ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाकडून खासदार मनोज तिवारी यांची कानउघाडणी

Gauri Tilekar

१०० टक्के सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार, सुनील राऊत यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची अधिकृत घोषणा

News Desk