HW News Marathi
राजकारण

“टाटा एअर बस प्रकल्प राज्याबाहेर जाणे ‘मविआ’चा फेक नरेटिव्ह”, फडणवीसांचा आरोप

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. तरी देखील शिंदे-फडणवीसच्या काळात प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आरोप हा विरोधकांचा  फेक नरेटिव्ह आहे, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वेदांता-फॉक्सकॉनसंदर्भात मी या आधी देखील सगळे सांगितले आहे. पण, तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणतात, फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. हे कोणाच्या काळात म्हटले, उद्धव ठाकरेंच्या काळात म्हटले?, असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या काळात उद्योग मंत्री सुभाष देसाईंना माहिती होते की, वेदांता-फॉक्सकॉन राज्यात येणार नाही. हा प्रकल्प गेलेला आहे. तर ज्यावेळेस तो प्रकल्प राज्याबाहेर गेला. मग, त्यावेळी अशी का भूमिका घेतली की, शिवसेनेनी, काँग्रेस आणि एससीपीने हा प्रकल्प आमच्या काळात गेला, अशी भूमिका घेतली. तुम्हाला माहिती होते, असे म्हणत देसाईनी स्टेटमेंटचे पत्र पत्रकार परिषदेत पत्रकार यांना दाखविले. याचा अर्थ पहिला फेक नरेटिव्ह हा फॉक्सकॉनचा करण्यात आला की आमचे सरकार आले आणि फॉक्सकॉन गेले.”
यानंतर टाटा एअर बस 23 सप्टेंबर 2021 गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये एअर बसचा प्रकल्प लागणार आहे. 22 हजार कोटीची डील झाल्याचे कागद पत्रे पत्रकारांना दाखविले. हा स्टे 23 सप्टेंबर 2021 रोजीचा आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी कोणाचे सरकार होते. उद्धव ठाकरेंचे सरकार होते. बिझनेस वर्ल्डने बातमी छापून आली की, टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर संडे एक्स्प्रेस टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेला आहे. आणि यात रेकॉर्ड दिले आहे की, संडे एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही टाटा एअर बस प्रकल्पासाठी गुजरातमध्ये जात आहात. यासाठी आम्ही लवकरात लवकर म्हणजे डिसेंबर 2021.” आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे आपले राज्य विसरत नाही. मला ज्या क्षणी कळाले की, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला जाण्याचा विचार करते. त्यांचे कारण काय 2016 साली ज्या वेळेस पहिल्यांदा टाटाचे आणि एअरबसचे बोलणे सुरू झाले. तेव्हा एमओयू झाला नव्हता. त्यावेळी मी टाटांकडे गेलो. तुम्ही नागपूरला प्रकल्प आणा म्हणून मी त्यांना सांगितले. त्यादिवसापासून ते 2019 पर्यंत मी त्यांचा फॉलोप केला. मी त्यांच्या टीमला नागपूरला घेऊन गेलो होतो. तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात प्रकल्पासाठी स्पर्धा सुरू होती.”

 

Related posts

राज्यपालांनी माफी मागितली नाही यांची खंत! – उदयनराजे भोसले

Aprna

“प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नाहीये”, बच्चू कडू यांचा सूचक इशारा

Aprna

साताऱ्यातील पावसाचा एक राजकीय बळी !

News Desk