नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय संपूर्ण बदलली आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची महाआघाडी झाली आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी आज (१७ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन त्यांचा भाचा आकाश आनंदचा बहुजन समाज पक्षामध्ये समावेश करून त्याला शिकण्यासाठी संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काहींना आक्षेप असेल, तर असू द्या आमचा पक्ष त्याची काळजी करत नाही, असे देखील मायावती यांनी नमूद केले आहे.
Mayawati announces nephew Akash Anand's entry in BSP, trains gun on media
Read @ANI Story | https://t.co/Rugqa3PDhA pic.twitter.com/SatRHiN6qs
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2019
या दरम्यान महाआघाडीविरोधात उचित मार्गाने लढणयापेक्षा काही पक्षांकडून गलिच्छ भाषेचा वापर सुरू असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. काही टीव्ही चॅनेल्स दलितविरोधी असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. बसपा आणि सपा महाआघाडीची लोकप्रियता वाढत असल्याचा दावा मायावती यांनी केला. प्रत्येकी ३८ जागांवर लढणार दोन्ही पक्ष लढणार आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनी एकत्रित पत्रकार घेऊन जागावाटप आणि आघाडीची घोषणा केली मागील आठवड्यात केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.