HW News Marathi
राजकारण

#मीटू : एम. जे. अकबर यांची ९७ वकिलांची फौज

नवी दिल्ली | मीटू मोहिमेतून एका महिला पत्रकारने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या महिला पत्रकाराविरोधात अकबर यांनी मानहानीचा दावा केला आहे. अकबर यांनी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जवळपास ९७ वकिलांची फौज न्यायालयात उभी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अकबर यांच्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. यात केवळ ३५ महिला वकील असून या ९७ वकीलांपैकी केवळ ६ विकलच प्रत्यक्ष न्यायालयात अकबर यांची बाजू मांडतील, असे करांजवाला अँड कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एम. जे. अकबर संपादक पदावर असताना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप १० महिलांनी केला आहे.

मात्र हे आरोप खोटे असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनेच हे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. अकबर यांनी निर्दोष सिद्ध करण्यासाठी सर्व महिलांना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. या महिलांसाठी न्यायालयात खेचले असून यांच्या विरोधात न्यायालयात ९७ वकीलांची फौज सज्ज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“… तर संपूर्ण देशात परिवर्तनाची लहर”; नाना पटोलेंची भविष्यवाणी

Darrell Miranda

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी | नरेंद्र मोदी

News Desk

प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड

News Desk
क्राइम

मॉडेलच्या हत्येचे गुढ उलघडले

News Desk

मुंबई । मालाड मध्ये एका मॉडेल तरुणीची काल (१५ ऑक्टोम्बर) रोजी हत्या करण्यात आली आहे.मानसी दीक्षित असे हत्या करण्यात आलेल्या मॉडेलचे नाव आहे. मालाडच्या माईंड स्पेस परिसरात रस्त्याच्या कडेला फेकलेल्या एका बॅगेमध्ये मानसी दीक्षित (२०) या मॉडेलचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह सापडल्यांनंतर पोलिसांनी ३ तासात आरोपीचा छडा लावला आहे. मुजम्मील सय्यद हे आरोपीचे नाव आहे. बांगूर नगर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुजम्मिल हा मानसीचा मित्र होता. मुज्जमील सय्यद हा १९ वर्षाचा आहे. घटना घडली त्या दिवशी मानसी आणि मुजम्मीलमध्ये काही कारणांवरुन वाद झाला आणि मुज्जमीलने रागाच्या भरात मानसीचे डोके स्टूलवर आपटले. या घटनेत अजाणतेपणे मानसीचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

एका कॉमन फ्रेण्डच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. मानसी ही मूळची राजस्थानची होती. मात्र गेल्या ६ महिन्यांपासून ती अंधेरीमध्ये (पश्चिम) वास्तव्यास होती. मुजम्मीलच्या ओशिवरा येथील घरामध्ये मानसी गेली,असताना ही घटना घडली आहे. घटनास्थळावर बेवारस अवस्थेत बॅग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली.बॅगमध्ये त्यांना मानसीचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर जखम आढळून आली. तिचा मृतदेह बेडशिटमध्ये गुंडाळून बॅगमध्ये भरण्यात आला होता.

Related posts

अंबरनाथमध्ये तरुणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

News Desk

भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना उडविले

News Desk

पोलिस बंदोबस्तात अॅड. निकम यांचे मोबाईल चोरीला

News Desk