HW News Marathi
राजकारण

मनसेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (१ नोव्हेंबर) कुर्ला विभागातून महानगरपालिकेच्या एल विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी त्या मोर्चामध्ये मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित होते. या मोर्चा दरम्यान या दोन नेत्यांमध्ये वाद झाला. संदीप देशपांडे बोलू देत नसल्याने मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर नाराज झाले. त्यांनी मोर्चाच्या ठिकाणीच आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे झांझावाती दौरे काढत आहेत. तर दुसरीकडे मनसेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. या मोर्चात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, संतोष धुरी इत्यादी नेते सहभागी झाले होते. यात मुंबईतून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाची ताकद दाखवण्यास जमले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाकरे सरकारच्या नामांतराला शिंदे सरकारनी दिली स्थगिती

Aprna

अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

News Desk

छत्तीसगढमध्ये भाजपने केली जाहीरनाम्याची घोषणा

swarit
राजकारण

उद्धव ठाकरेंची पुन्हा स्वबळावर लढण्याची घोषणा

Gauri Tilekar

महाड | रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज महाड येथे मेळावा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुन्हा शिवसेना स्वतंत्र आणि स्वतःच्या हिंमतीवर लढणार असल्याचे म्हटले आहे. “मावळे समोर आहेत लढण्याची सुरुवात झाली आहे. देशाचं राजकारण आणि वातावरण चांगले नाही. या विटा तुमच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठीच्या पायऱ्या आहेत त्या राम मंदिरासाठी नव्हत्या,” असा तीव्र आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुढच्या वर्षी २०१९ मध्ये निवडणूक येत आहेत पण आम्हाला लोकांचे काय होणार, देशाचे काय होणार याची चिंता असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लोक शिवसेनाप्रमुखांशी राजकारण खेळताना मी स्वतः जवळून पाहिले आहे. हा पक्ष पुढे कसा न्यायचा हे शिवसेनाप्रमुखांनी मला शिकवले आहे. एकदा भाजपाने सांगावे की, राम मंदिर जुमला होता, मग २८० वरून २ पर्यंत आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले आहेत.

सर्वसामान्य लोकांना विचारा कि, मोदींच्या योजनेचा तुम्हला काय फायदा झाला ? आम्हाला लोकांंना फसविणारी लोक नकोत. शिवसैनिकांचे प्रेम ही माझ्यासाठी खूप मोठा दागिना आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहीजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली | अब्दुल्ला

News Desk

आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार

Gauri Tilekar

सर्वोच्च न्यायालयात 20 जुलैला एकनाथ शिंदे सरकारचे भविष्य ठरणार

Aprna