HW Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुका लढविण्यास मनसे इच्छुक नाही ?

मुंबई | राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी गुरुवारी(७ फेब्रुवारी) मनसेला आघाडीत घेण्यासाठी पुढाकार घेतला असून शरद पवार यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन जागांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास मनसे इच्छुक नसल्याचे शरद पवार यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. मनसे विधानसभा निवडणुका लढविण्यास इच्छुक असून लोकसभा निवडणूक लढविण्यास आम्हाला काही रस नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती मिळत आहे.

आम्ही केवळ विधानसभा निवडणुका लढविण्यात इच्छुक आहोत म्हणूनच आम्ही लोकसभेच्या जागेसाठी प्रस्ताव दिला नाही. मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी शरद पवार यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related posts

जाणून घ्या…महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाबाबत

News Desk

अमृता फडणवीस यांचा ‘दीवानी मस्तानी’ गाण्यावर भन्नाट डान्स

News Desk

आव्हाडांनी का घेतली उद्धव ठाकरेंची भेट ?