HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

गुढीपाडवा निमित्ताने राज ठाकरेंची सभा; सेनाभवना समोरील बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही मनसेचा (MNS) मेळावा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. राज ठाकरे भाषणात काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मनसेच्या मेळाव्या निमित्ताने दादरमध्ये बॅनरबाजी लावण्यात आली आहे. मनसेचे बॅनर हे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मनसेच्य बॅनरमध्ये राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आला असून “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे” या आशयाचे बॅनर सेनाभवनासमोर लावण्यात आले आहे. राज ठाकरेंचा बॅनर दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे हे आजच्या सभेत राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थिती काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे. मनसेच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर देखील जारी करण्यात आला होता. मनसेचा 40 सेंकदाचा टिझरमध्ये सुरुवातीलाच विधानभवनाचा फोटो आणि राज ठाकरेंच्या आवाजात एक ऑडिओ सुरू आहे. गेल्या दोन अडीत वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे. ही चांगली गोष्ट नाही बरे का…महाराष्ट्रासाठी असे महाराष्ट्रात कधी नव्हते. हेच खरे राजकारणे आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे!”  “महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी… चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सौंगध मुझे इस मिट्टी की मैं देश नही मिटने दूंगा !

News Desk

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला,महाराष्ट्रातील ‘या’गोष्टी घातल्या राज्यपालांच्या कानावर…

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

Aprna