HW News Marathi
राजकारण

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या मंत्रिमंडळाचा आज (७ जुलै) विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यावेळी महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील नेत्यांना झुकतं माप देण्यात येणार आहे. एकूण ४३ मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता सांगितली जात आहे. त्यामुळे कोणा कोणाला या मंत्रिमंडळात प्रवेश दिला जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्यांची, नेत्यांची वर्णी केंद्रात लागणार हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे.

मंत्र्यांकडून राजीनामे येण्यास सुरुवातमोदी-कॅबिनेट विस्ताराला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, थावरचंद गहलोत यांनी राजीनामा दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मधल्या काळात शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेत मंत्रिपदाचे राजीनामे दिले. त्यामुळे मंत्रिपदे रिक्त झाली आहेत. शिवाय लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनामुळेही एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे हा विस्तार होत आहे. त्यात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, हिना गावित आणि कपिल पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपला मित्रपक्ष उरला नाही. परिणामी भाजपसमोर तीन पक्षाचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपला मजबूत करून पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला झुकते माप देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

४३ नेत्यांचा शपथविधी
आज सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात ४३ मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहे, ही संख्या वाढून ८१ होणार आहे.

शपथविधी पूर्वी चार मंत्र्यांचे राजीनामे

दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीपूर्वीच चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांबद्दलही तेवढीच उत्सुकता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातसह जवळपास सहा राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा आहे.

मोदींच्या निवासस्थानी बैठक हे नेते होते उपस्थित


सर्वानंद सोनोवाल
ज्योतिरादित्य सिंधिया
अनुप्रिया पटेल
पशुपती पारस
मीनाक्षी लेखी
अजय भट्ट
शोभा करदंलाजे
नारायण राणे
भागवत कराड
हिना गावित
प्रीतम मुंडे
अजय मिश्र
आरसीपी सिंह
भूपेंद्र यादव
कपिल पाटिल
बीएल वर्मा
अश्ववनी वैष्णव (ओडिशा)
शांतनु ठाकूर(बंगाल) 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक

swarit

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

News Desk

स्वप्ने अशीच दाखवा जी पूर्ण करता येतील, गडकरींचा भाजपला घरचा आहेर

News Desk