कुरुक्षेत्र | “परदेशी पर्यटक एक दिवस भारतातील शौचालये पाहण्यासाठी येतील,” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्रातील जाहीर सभेत बोलत होते. मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा सुरू आहे. मोदी पुढे असे देखील म्हणाले की, “युरोपातील एका ठिकाणी पर्यंटक घरांच्या रंगवलेल्या सुंदर भिंती पाहायला जातात. एक दिवस असाही येईल की, परदेशी पर्यटक भारतातील शौचालये पाहण्यासाठी येतील.”
PM Modi in Kurukshetra: There is a place in Europe where a lot of tourists visit since the front walls of the houses are painted beautifully. Maybe, one day there will be a village in Hindustan where toilets & paintings on it will be so good that tourists come to see it. pic.twitter.com/r2j4hfUyLx
— ANI (@ANI) February 12, 2019
तसेच स्वच्छ शक्ती २०१९ या कार्यक्रमातून मोदींनी आज (१२ फेब्रुवारी) महिलांशी संवाद साधला. मोदींचा हा दौरा राजकीय नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. “देशातील मध्यवर्गीय लोक काँग्रेस सरकारपासून त्रस्त होते. त्या व्यक्तींनी माझ्यासारख्या प्रामाणिक ‘चौकीदार’वर विश्वास ठेवला आहे. हे देशातील काही लोकांच्या पचणी पडत नसल्यामुळे त्या लोकांनी ‘महामिलावटी’ गंठबंधन बनवून सर्वोच्च न्यायायल, सीबीआयच्या सहायाने माझ्यावर टीकास्त्र सोडत आहेत,” असे बोलून मोदींनी मात्र विरोधकांवर निशाणा साधला आहे.
PM:Middlemen & those who loot rights of poor have been eradicated from the system. Today all honest people have faith in 'chowkidaar', "lekin jo bhrasht hain unko Modi se kasht hai".The faces of 'mahamilavat' are in a competition among themselves to threaten court,CBI,&abuse Modi pic.twitter.com/uOXpjz7r9q
— ANI (@ANI) February 12, 2019
मोदींनी कुरुक्षेत्रातील सभा संबोधिक करताना म्हणाले की, “मी लाल किल्ल्यावरुन स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली, त्यावेळी विरोधकांनी माझी टिंगल केली. त्यावेळी माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नाही. या कार्यक्रमाला नायजेरियाहून आलेले पाहुणे उपस्थित होते. त्यांचे मोदींनी स्वागत केले. ‘स्वच्छ भारत योजनेला मिळालेले यश पाहण्यासाठी तुम्ही इथे आलात, अशी माहिती मला मिळाली. असेच अभियान तुम्हाला नायजेरियात राबवायचे आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या अभियानाला यश मिळो,’ असे पंतप्रधान म्हणाले.”
PM in Kurukshetra, Haryana: I welcome our guests from Nigeria. I am told that you are here on a study tour since the past week to learn how Swachh Bharat mission had such dramatic success so quickly & how it can be replicated in Nigeria. I wish you all success pic.twitter.com/ZgRMLLUCog
— ANI (@ANI) February 12, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.