HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता !

मुंबई | “तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता. परंतु, मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. “तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही असे सांगतानाच आमचा राष्ट्रवाद हा शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद यांचा राष्ट्रवाद आहे”, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली. “आमच्या राष्ट्रवादाने आम्ही उभे राहून खोटया राष्ट्रवादाला उखडून टाकू”, असा दावाही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नगरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद एक निव्वळ दिखावा असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “आमच्या राष्ट्रवादात सर्व लोकांना घेऊन जाण्याचा विचार आहे. तर तुमचा राष्ट्रवाद हा कुठेना कुठे मनुवादी विचारांनी भारलेला आहे. आमचा राष्ट्रवाद समता स्थापन करणारा आहे. राष्ट्रवादीच्या याच राष्ट्रवादाच्या ताकदीवर या देशातील लोकांना ताकद मिळाली आहे. आपण विशेष वर्गाला ताकद देणार्‍या वर्गाची वकालत करत आहात. त्यामुळे तुमच्या राष्ट्रवादापेक्षा आमचा राष्ट्रवाद कमजोर पडणार नाही”, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Related posts

आयनॉक्स थिएटरमध्ये ‘ठाकरे’च्या पोस्टरवरून शिवसैनिकांचा राडा

News Desk

EXIT POLL : तेलंगणातील जनतेचा कौल टीआरएसच्या बाजूने, भाजपची घोर निराशा

News Desk

पंडित नेहरुंमुळे आज देश प्रगतीपथावरः जितेंद्र आव्हाड

News Desk