HW News Marathi
राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे विधानभवनाबाहेर आंदोलन

मुंबई | अखिल भारतीय हिंदू महासभेच्या काही लोकांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. याचा निषेध म्हणून आज (२५ फेब्रुवारी) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मुक आंदोलनाला सुरुवात केली आहे. काळ्या फिती बांधून हे आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी महात्मा गांधींच्या विचारांना देशातून नामशेष करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांविरोधात हे आंदोलन केले आहे.

महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी हिंदू महासभेकडून महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर “केरला सायबर वॉरिअर्स”कडून अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. या वेबसाईटवर ‘हिंदू महासभा मुर्दाबाद’ असे लिहिण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील अलीगड येथे महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी ३० जानेवारीला हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडेय यांनी गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. इतकेच नव्हे तर यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्राला हार अर्पण करून मिठाई वाटत ‘महात्मा नथुराम गोडसे अमर रहे’ च्या घोषणाही देण्यात आला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळी बोनससाठी पालिका कर्मचार्‍यांचा आझाद मैदानात धडक मोर्चा

swarit

मुंढेच्या बदलीचा आनंद व्यक्त करणे नाशिक महापौरांना पडणार महागात

News Desk

राम मंदिर हा कोणत्याही एकाच पक्षाचा पेटंट मुद्दा नाही !

News Desk