भोपाळ | नेहमी कोणाकोणत्या वादाच्या भोवरात राहणाऱ्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. “मी गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेले नाही,” असे उत्तर प्रज्ञा सिंह यांनी मध्य प्रदेशातील सिहोर येथील कार्यक्रमा वेळी बोलताना म्हणाली. प्रज्ञा सिंह यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रज्ञावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
#WATCH BJP MP from Bhopal, Pragya Thakur in Sehore: Hum naali saaf karwane ke liye nahi bane hain. Hum aapka shauchalaya saaf karne ke liye bilkul nahi banaye gaye hain. Hum jis kaam ke liye banaye gaye hain, vo kaam hum imaandaari se karenge. #MadhyaPradesh pic.twitter.com/VT4pcGKkYx
— ANI (@ANI) July 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजुला सरकार ‘स्वच्छ भारत अभियाना’ला प्रोत्साहन देत आहे. तर दुसऱ्या बाजुला भाजपच्याच खासदाराचे हे वक्तव्य सर्वांच्या भुवया उंचावणारे आहे. सिहोर परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. याला उत्तर देताना प्रज्ञा सिंह यांनी म्हटले की, “मी गटारेआणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेली नाही. ज्यासाठी मला खासदार म्हणून जनतेने निवडून दिले आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू. “
‘मुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला.’ या प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. तर दुसऱ्या बाजुला दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देत प्रज्ञ सिंह म्हणाली की, “नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील,” पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले होते. सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी प्रज्ञा सिंह यांनी माफीनामा मागितला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.