HW News Marathi
राजकारण

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा राम कदमांच्या निवासस्थानी निषेध मोर्चा

मुंबई | मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवारी भाजपा आमदार राम कदम यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मुलींना कसे पळवायचे? याचे दहीहंडी कार्यक्रमात जाहीर रीत्या युवकांना प्रबोधन देऊन त्यांना अपहरणासाठी प्रवृत्त करणारे आमदार राम कदम यांनी प्रत्येक आई-बापाची प्रतिष्ठा पणाला लावलेली दिसते. एकीकडे मातापित्याचा सन्मान करा, मी ६०००० भगिनींचा भाऊ आहे, अशी भावनात्मक विधाने करून आपलेसे करू पाहणाऱ्या या रावण रुपी भावाचे प्रताप आता जगजाहीर झालेत. समस्त महिला वर्गाचा अपमान करणाऱ्या या आमदाराने त्वरित जाहीर माफी मागावी अशी मागणी मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांनी यावेळी केली.

आम्ही अशा घटना घडणाऱ्या कुटुंबाच्या मागे राहून त्यांचे संरक्षण करू,कारण आमच्यावर संस्कार आहेत शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचे ज्यांनी सदैव महिलांना प्रतिष्ठा मिळवून दिली. परस्त्रीला मातेचा दर्जा दिला. आमच्या पक्षाचे नेते शरद चंद्रजी पवारसाहेब यांनी तर महिलांना आरक्षण देऊन प्रत्येक शासकीय क्षेत्रात त्यांना सहभागी करून पुरुषांसोबत काम करण्याची संधी दिली. महिला विशेषतः मुलींबद्दल अशी विधाने करणाऱ्या आमदार राम कदम यांचा आम्ही सर्व महिला जाहीर निषेध करीत आहोत. असे यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याने आपला ‘चौकीदार’ गमावला, देशातून सचोटीचे प्रयाण झाले !

News Desk

शिवसेनेच्या महिला आघाडी-युवासेनेने अयोध्येत येऊ नये | ठाकरे

News Desk

धनंजय मुंडेंचा आज जालना, बीड जिल्ह्यात गारपीट भागाचा दौरा

News Desk