HW News Marathi
Covid-19

पुण्यात चौथ्या टप्यात १५ लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचं टार्गेट – मुरलीधर मोहोळ

पुणे | आजपासून (१ एप्रिल) चौथ्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही आजपासून चौथ्या टप्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ४५ वर्षांवरील सरसकट नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यात पुण्याचे प्रथम नागरीक महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही आज लस घेतली. आत्तापर्यंत ३ लाख ६० हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर या चौथ्या टप्प्यात १५ लाख नागरिकांना लस देण्याची तयारी पालिकेने केली आहे. आत्तापर्यंत लसीकरणाच्या मोहिमेला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पात्र असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

दरम्यान ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात असताना, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. असं असलं तरी अजूनही ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. पुण्यात लसीच्या डोसची कमतरता नाही, शिवाय ती सुरक्षित असल्याचं लसीकरण केंद्र प्रमुखांनी सांगितलं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज लस देण्यात आली. कोथरूडच्या सुतार दवाखान्यात ही लस देण्यात आली. यावेळी शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्वांनी लसीकरणात सहभाग नोंदवला पाहिजे असं आवाहन यावेळी महापौरांनी केलं आहे.

पुणे देशात अव्वलसर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेलं पुणे शहर कोरोनाच्या समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी ६ ते ८ हजार कोरोना बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमधून काळजी व्यक्त केली जातेय. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगत कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ११,८१३ नवे रुग्ण तर मुंबईत ७९ टक्के रिकव्हरी रेट

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अनेक लोकांना कोरोनाची लागण

News Desk

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस!

News Desk