मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) एच.डब्ल्यू.न्यूज नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अनेक नव नवीन पैलू उलगडले आहेत. महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील सर्वांनाच राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोन कौटुंबिक वादाची माहिती आहे. राज ठाकरेंनी एच. डब्ल्यू न्यूज नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटले की, ” नरेंद्र मोदींसारखा व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलू शकतो तर या जगात काहीही होऊ शकते,” असे विधान त्यांनी केले आहे. राज ठाकरेंच्या या विधाननंतर पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागल्या आहे.
प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार का, अशी चर्चा रंगताना दिसते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, तुर्तास आम्ही एकत्र येण्याची शक्यता दिसत नाही. पण भविष्यात काहीही होऊ शकते. असे राज ठाकरे यांनी एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.
नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी बघायला आवडेल का असा प्रश्नही राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंनी थेट उत्तर देणे टाळले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता कमीच आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तरी त्यांनी (पक्षनेतृत्वाने) नितीन गडकरींना संधी दिली पाहिजे ना, असे सांगत राज ठाकरे यांनी एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीत बोलण्यास टाळटाळ केली.
नोटाबंदीने हजारो लोकांना बेरोजगार केले, विरोधी पक्षात असताना जीएसटीला विरोध केला होता. परंतु सत्तेत आल्यानंतर मात्र जीएसटी लागू करतात आणि बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे. हे कोणते अच्छे दिन आहेत, असा सवालही त्यांनी भाजपला एच. डब्ल्यूला दिलेल्या मुलाखतीतून विचारला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलतील असे वाटले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.