नवी दिल्ली | ‘काँग्रेस सरकार जातीपातीचे राजकारण करत होते. आणि छत्तीसगढ मध्ये नक्षली कारवायांचे देखील समर्थन करत होते. त्यामुळे या काँग्रेसला धडा शिकलाच पाहिजे’, असे आवाहन मोदींनी त्यांच्या भाषणा दरम्यान केले आहे. छत्तीसगढ विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला दोन दिवसांचा कालावधी उरला असल्याना भाजप आणि काँग्रेसमधील आरोपांच्या फैरी झडत आहेत.
I urge the people of Bastar to teach a fitting lesson to the Congress leaders, who on one hand try to shield the urban Maoists, and in Chhattisgarh, they speak about freeing the state from Maoists: PM Modi #ChhattisgarhElections2018 pic.twitter.com/a7r5wjxKXN
— ANI (@ANI) November 9, 2018
मोदी पुढे असे देखील म्हटले की,‘सबका साथ सबका विकास या धोरणानुसार भाजप देशात विकास कामे करत आहे. देशातील सर्वच घटकांचा विकास करणे हे भाजपचे ध्येय असून देशात हमारा-तुमारा असा खेळ अजिबात चालणार नाही,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. छत्तीसगढच्या जगदलपूर येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना मोदी म्हणाले होते.
Hume vikas bhi sabka karna hai aur saath bhi sabka chahiye. Ab mere tere ka khel desh mein nahi chalega: PM Narendra Modi in Jagdalpur #ChhattisgarhElections2018 pic.twitter.com/fpSelX4JlD
— ANI (@ANI) November 9, 2018
शहरी नक्षलवादावरून मोदी यांनी काँग्रेसवर प्रखर हल्ला चढवला असून दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, नोटबंदीवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लबोल केला आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, मेहुल चोक्सी यांच्या फरारी होण्यावरूनही मोदींवर सडकून टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.