HW News Marathi
राजकारण

नरेंद्र पाटील यांच्या ‘मातोश्री’ भेटीत नेमके दडलय काय ?

मुंबई | राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पाटील यांना सेनेकडून उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाटील यांनी आज (२२ मार्च) उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर आले होते. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र पाटील यांची ही सदिच्छा भेट होती असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळवले. माथाडी कामगारांच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी त्यावेळी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतरच्या युतीमधील जागा वाटपाच्या घडामोडीनंतर लोकसभेसाठी सातार्‍यातील शिवसेना उमेदवारीचा तिढा निर्माण झाला. सातारा मतदारसंघातून आधी भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव समोर आले होते. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. परंतु नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आव्हान

News Desk

#Vidhansabha2019 | भाजपकडून ‘या’ आयारामांना उमेदवारी जाहीर

News Desk

गंभीरने मुख्यमंत्री केजरीवालांसह ३ जणांवर ठोकला मानहानीचा दावा

News Desk