HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

माढाचा तिढा अखेर सुटला, राष्ट्रवादीकडून संजय शिंदे निवडणूक लढविणार

मुंबई | बहुचर्चित अशा माढा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून माढा मतदारसंघात संजय शिंदे निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. शरद पवार हे माढ्यातील पदाधिकाऱ्यांची आज (२२ मार्च) दुपारी ४ वाजता बैठक घेतील. या बैठकीनंतर माढा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. संजय शिंदे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. खरंतर, शरद पवार हेच माढा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, एकाच कुटुंबातील इतके जण नको, असे म्हणत शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली.

माढा मतदार संघातून सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव चर्चेत होते. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील माढ्यातून तिकीट न मिळाल्यामुळे विजयसिंह यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला

 

Related posts

गुजरातमध्ये भाजप तर झारखंडमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

News Desk

प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसला राम राम ठोकण्याच्या तयारीत ? काँग्रेसला मोठा झटका

News Desk

नाणार प्रकल्पासाठी काहीच आठवड्यात जमीन मिळणार, यूएईच्या राजदूतांची माहिती

News Desk