HW News Marathi
राजकारण

लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहिरनामा समिती जाहीर

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समितीची स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या जाहीरनामा समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

या जाहीरनामा समितीमधील सदस्य

आमदार भास्करराव जाधव, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विदया चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विक्रम काळे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, प्रदेश प्रवक्ते भूषण राऊत यांचा जाहीरनामा समितीमध्ये समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आयुष्यमान भारत’ योजना म्हणजे मोदी सरकारचा अजून एक ‘जुमला’ – सचिन सावंत

News Desk

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

पंतप्रधान मोदी बिनकामाचे, राहुल गांधींची बोचरी टीका

News Desk