HW News Marathi
राजकारण

‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखेच | मलिक

मुंबई | “देशात तसेच राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता येणार नाही. त्यामुळे ‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखेच असणार आहे”, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. “जर पंतप्रधान तुमचा झाला तर मुख्यमंत्री आमचा असेल”, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

“संजय राऊत कालपर्यंत तुमचा पंतप्रधान तर आमचा मुख्यमंत्री असे करत होते. आमचाच मुख्यमंत्री होईल असे उद्धव ठाकरे सांगत होते. मात्र, ना नवमन तेल होगा ना राधा नाचेगी”, असे म्हणत नवाब मलिक यांनी शिवसेना-भाजपला लक्ष्य केले आहे. “लोकांना सत्ता परिवर्तन हवे आहे. लोकसभा असो वा विधानसभा भाजपचा प्रभाव निश्चित आहे”, असेही मलिक यांनी यावेळी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ फेब्रुवारीला संध्याकाळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप-सेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा केली. युतीच्या घोषणेनंतर शिवसेना-भाजपवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार टीका केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आंबेडकर-फुलेंनी शाळा सुरु करताना लोकांकडे भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Aprna

विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने कशी असतील राज्यातील समीकरणे ?

News Desk

आता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय ? मारायचे की सोडायचे ?, पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk