पाटणा | बिहारमध्ये बुधवारी (२७ मार्च) नक्षलवाद्यांनी एका भाजप नेत्याचे घर डायनामाइटचा स्फोट घडवून उध्वस्त केले आहे. दरम्यान, या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. नक्षलवाद्यांनी माजी आमदार आणि भाजप नेते अनुज कुमार सिंह यांचे घर उध्वस्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकांवर अनुज कुमार सिंह यांनी बहिष्कार टाकावा, असे देखील नक्षलवाद्यांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.
Gaya: Residence of former MLC & BJP leader Anuj Kumar Singh in Dumariya blasted with dynamite by Naxals last night. No casualties reported. The Naxals also left a poster demanding boycott of elections. Police investigation underway. #Bihar pic.twitter.com/bcr8xNQczX
— ANI (@ANI) March 28, 2019
अनुज कुमार सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवू नये, याचसाठी नक्षलवाद्यांकडून हा स्फोट घडवून आणला गेल्याचे म्हटले जात आहे. २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारे जनार्दन राय यांचे घर उध्वस्त केले होते. अनुज कुमार सिंह यांच्या बिहारमधील या घरात त्यांच्या काकांचे कुटुंब राहते. अनुज कुमार सिंह यांचा चुलत भाऊ जय सिंह यांना नक्षलवाद्यांकडून मारहाण देखील करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे एसएसपी राजीव मिश्रा यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.