नवी दिल्ली | अरविंदर सिंग नावाच्या एका इसमाने २०११ साली दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या श्रीमुखात भडकावली होती. दरम्यान, आता या घटनेच्या तब्बल ८ वर्षांनंतर या संबंधित इसमाला अटक करण्यात आली आहे. गेल्या तब्बल ८ वर्षांच्या शोधानंतर अखेर आज (१३ नोव्हेंबर) या इसमाला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, ज्यावेळी ही घटना घडली त्याचवेळी या इसमाला अटक करण्यात आली होती. मात्र, तो कोठडीतून पळून गेला. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला मात्र त्यात यश मिळाल्याने २०१४ साली दिल्ली न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.
Delhi: Arvinder Singh (also known as Harvinder Singh), who had slapped NCP Chief Sharad Pawar in 2011, and was absconding since then, has been arrested by the police. He was declared a Proclaimed Offender by a Delhi Court in 2014. pic.twitter.com/4tEs7tphPq
— ANI (@ANI) November 13, 2019
शरद पवार यांनी आपल्यावर झालेल्या या हल्ल्याला ‘भ्याड हल्ला’ असे संबोधले होते. सर्व काही भ्रष्ट असल्याचे म्हणत त्या इसमाने शरद पवार यांच्यावर हा हल्ला केला होता. शरद पवार २०११ साली कृषीमंत्री असताना दिल्लीतील इफ्कोच्या एका कार्यक्रमादरम्यान अरविंदर सिंग नावाच्या या व्यक्तीने त्यांच्या श्रीमुखात भडकावली होती. या कार्यक्रमातून बाहेर पडताना सहारा पवार यांच्यावर हा हल्ला झाला होता. त्यावेळी, तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या इसमाला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, अटकेनंतर हा इसम पळून गेल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. आता अखेर या इसमाला ताब्यात घेण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.