HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मोदींनी माझ्या कुटुंबाची काळजी करू नये, माझ्यावर कोल्हापूरच्या मातीचे संस्कार झाले आहेत !

कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाची काळजी करू नये. माझ्यावर कोल्हापूरच्या मातीचे संस्कार झाले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली. पवार यांनी कोल्हापुरात काल (२ एप्रिल ) रोजी झालेल्या आघाडीच्या मेळाव्यात बोलताना म्हटले आहेत.

मोदींनी वर्ध्याच्या प्रचार सभेदरम्यान पवार यांच्य कुटुंबावर टीका केली होती. “शरद पवारांची पक्षावरील पकड सैल होत असून पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत,” असे मोदी म्हणाले होते. शरद पवारांनी मोदींच्या टीकेला प्रतित्तर देत म्हटले की, अजित पवार हे उत्तम प्रशासक असून राष्ट्रवादी पक्ष कोणत्याही एकाचा नसून हा पक्ष संपूर्ण जनतेचा पक्ष आहे.

तसेच मोदींनी गांधी कुटुंबावर केलेल्या टीकेला उत्तर देत म्हटले की, जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्यातील उमेदीची १३ वर्षे तुरुंगात काढली, देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा व राजीव गांधी यांनी बलिदान दिले, त्या घराण्याच्या त्यागाची किंमत तुम्हाला नाही कळली तरी ती देशाला माहीत आहे. तसेच सोनिया गांधी यांची स्तुती करत राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरही त्यांनी देश सोडला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी जपली, असेही पवारांनी नमूद केले

तसेच ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असे म्हणणारे मोदी हे राफेल प्रकरणावर का बोलत नाहीत, असा प्रश्‍न पवारांनी कोल्हापुराच्या सभेत उपस्थित केला. मोदींनी केवळ हिंदू-हिंदू सुरु केले असून देशासाठी सर्वच जातीधर्माचे योगदान आहे. त्यामुळे मोदींनी पदाचा आणि शपथेचा द्रोह केला आहे.

Related posts

महानगरपालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा उद्यापासून बंद

News Desk

राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

News Desk

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे प्रफुल्ल पटेल यांनी ईडीच्या चौकशीला मारली दांडी

News Desk