HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

ब्रेकिंग! मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

ठाणे | ठाण्यातील विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलं होतं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आव्हाड यांचे समर्थक यांनी यावरून निदर्शनही केले होते. यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. आव्हाड यांच्यासह इतर 12 जणांना देखील सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटावरून सुरू झालेल्या वादात जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. तर थेट सिनेमागृहात जाऊन केलेल्या मारहाणीप्रकरणी आव्हाड आणि त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी आव्हाडांना अटक केली. शुक्रवारी ठाण्याच्या वर्तक नगर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यानंतर ठाण्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. आव्हाडांना अटक होताच त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शनं केली. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसला.

दरम्यान सिनेमागृहात प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी काल आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी आव्हाडांनी ट्वीट केलं होतं. “पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही” असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. परंतु थोड्याच वेळात न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर निकाल देत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

.तर २०१९ मध्ये भाजप सत्तेतून हद्दपार

News Desk

संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेने ठेवले दुधात

News Desk

महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्मनिर्भर करुया! – अजित पवार

Aprna