HW News Marathi
राजकारण

शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव; रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई | भाजपने शिवसेना (Shiv Sena) फोडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फोडण्याचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. राहित पवार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

भाजपने शिवसेनेचे दोन गट पाडल्यानंतर पवार कुटुंबातही फूड पाडण्याचा डाव आहे. रोहित पवार कुटुंबसंबंधावर बोलताना म्हणाले, “आमचे ध्येय वेगळे असून सुप्रियाताई यांचे टार्गेट लोकसभा आहे. तर अजितदाद हे राज्यात काम करत आहेत. आणि मी माझ्या मतदारसंघात काम करतोय. परंतु, विरोधकांना आमचे कुटुंब फोडायचे आहे. विरोधकांना असे वाटते की कुटुंबात अंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल. तर जसे त्यांनी शिवसेना फोडली, तसे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचे टार्गेट आहे.”

आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही

या मुलाखतीदरम्यान रोहित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत कसे संबंध आहे. आणि तुमच्या दोघात तणाव आहे का?, असा सवाल रोहित पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, “जिल्हा परिषद निवडणुकीत मला पहिले तिकीट हे अजित पवार यांनी दिले. आणि मला आमदारकीचेही तिकीट त्यांची दिले. एवढेच काय पण माझे लग्न सुद्धा अजित पवारांनी जमवले. जर तुम्हाला मोठे व्हायचे असेत. तेव्हा कुटुंबातील लोकासोबत स्पर्धा करायची नसते. तर आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही.”

 

 

 

Related posts

‘सत्ताभाव सोडा, सेवाभाव जोडा’ !

News Desk

Maharashtra Cabinet Expansion Live Updates : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्री पदाची शपथ घेण्यास सुरुवात

Aprna

आता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ !

News Desk