HW News Marathi
राजकारण

अहो चिऊ ताई…प्रविण ने प्रमोद को क्यों मारा ?, राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुंबई | भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि भाजप खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. “अहो चिऊ ताई… महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या. देश की जनता यह जानना चाहती हैं प्रविण ने प्रमोद को क्यों मारा ?” असा बोचरा सवाल या पोस्टर्समार्फत राष्ट्रवादीकडून विचारण्यात आले आहे. सोमय्या मैदानावर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण कार्यक्रमात पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

 

पूनम महाजन यांनी शरद पवार यांची तुलना चक्क रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली होती. “आपण सगळ्यांचे ऐकले असे दाखवून शरद पवार शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करतात. स्वत:ला मिळाले नाही, की इकडचे तिकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची स्थिती झाली आहे”, अशी वादग्रस्त टीका पूनम महाजन यांनी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून पूनम महाजन यांना पोस्टरद्वारे सुनावण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला १००० % विश्वास आहे कि टीडीपी विजयी होईल !

News Desk

मुख्यमंत्र्यांना केवळ निवडणूका दिसतात | नवाब मलिक

News Desk

विरोधकांना पराभूत करण्यासाठी तेलंगणात घुबडांचा वापर

News Desk