HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…आता तरी मला वाटत नाही”, शरद पवारांची उद्धव ठाकरेंच्या भाकितावर प्रतिक्रिया

मुंबई | “मध्यवधी निवडणुका आता तरी मला वाटत नाही”, असा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाकितावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी आज (24 फेब्रुवारी) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे त्यांनी भेट घेतली. युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधून समाधान वाटले.

यावेळी उद्धव ठाकरे हे चिंचवडच्या ऑनलाईन प्रचार सभेत मध्यवधी निवडणूक होणार असल्याचे वक्तव्य केले, याबद्दल तुम्हाला काय वाटते?, असा सवाल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केल्यावर शरद पवार म्हणाले, “आता त्यांचे मत मी कशाच्या आधारे हे काय जाणून घेतलेले नाही. आता तरी मला वाटत नाही.” मध्यवधी निवडणूकांची शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली, असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारल्यावर ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी जी शक्यता व्यक्त केली. त्यात तथ्य आहे”, असे एका ओळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले

उद्धव ठाकरेंनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ऑनलाईन सभेत बोलताना म्हणाले, “तुम्ही तुमचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन आमचा चोरलाय ना धनुष्यबाण तो घेऊन या.  आणि आम्ही मशाल घेऊन येतो. पण, ही निवडणूकनंतर होईल. आज मात्र कसब्यामध्ये काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावेच लागेल. आणि म्हणून ही निवडणूक जी आहे. दिवस पुढे सरकत चालेले आहेत. म्हणता म्हणता माझा तरी अंदाज आहे. विधानसभा मध्यवधी निवडणुकाल लागेल, लागू शकतात. कारण अपात्रतेचा जो काही विषय आहे. त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. आणि ते जर का उडाले. तर आपल्या राज्यात मध्यवधी निवडणुका लागू शकतात.”

 

Related posts

दंगल सदृश्य परिस्थितीचा देवेंद्र फडणविसांकडून निषेध तर सरकारला आवाहन!

News Desk

पवार-फडणवीस भेटीवर राज ठाकरे म्हणतात….

News Desk

‘कोरोनावेग थंडावतोय’, गेल्या २४ तासात ३०,०९३ रुग्ण!

News Desk