HW News Marathi
राजकारण

पवारांनी घराबाहेर पडू नये, सहपोलीस आयुक्तांनी घेतली भेट

मुंबई | महाराष्ट्र मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी १४४ कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पवार आज (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहे.

मात्र, कोणतीही नोटीस बजावण्यात आली नसतानाही पवार स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. पवार ईडी कार्यालयात शरद पवार बाहेर पडले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून त्यांनी घराबाहेर पडू नये, पोलीस विनंती करणार आहेत. यासाठी सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी घेतली शरद पवारांची भेट घेतली आहे.

ईडीने या घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू केली नाही, ज्यावेळेला गरज भासेल तेव्हा शरद पवारांना चौकशीसाठी बोलविले जाईल असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मिळाली आहे.शरद पवारांना ईडीचे तपास अधिकारी भेटणार नाहीत. त्यांना काही निवेदन द्यायचे असेल तर इतर अधिकारी भेटतील.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला

News Desk

शिवसेना ‘पीडीपी’च्या मंचावर जाताच सगळे आभाळ कोसळल्यासारखे बोंबलू लागले !

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द

Gauri Tilekar