मुंबई | विधीमंडळ पक्षनेता ठरविण्यासाठी आज (३० ऑक्टोबर) भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यापैकी भाजपची ही बैठक पार पडली असून भाजपकडून विधिमंडळ गटनेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, त्याचप्रमाणे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे, सुनील तटकरे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची विधिमंडळ सदस्यांची बैठक पार पडली.
Ajit Pawar has been appointed as Legislative Party leader of Nationalist Congress Party (NCP). (File pic) #Maharashtra pic.twitter.com/Qp2zxMv84R
— ANI (@ANI) October 30, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.