HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणार !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज (२५ मार्च) तीन भाषेतील जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केला आहे. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसोबत देखील चर्चा करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. राष्ट्रवादीने अंतरराष्ट्रीय स्थरावरील विषय डोळ्यासमोर ठेवून हा २४ पानाचे जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा जाहीरनामा तिन्ही भाषेत तयार करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन केले तर दिल्ली राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांनी या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले आहे.

आघाडी सरकारच्या काळात जे कार्य करण्यात आले त्यासंदर्भाचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएने जो दावा केला होता भ्रष्टाचार समुळ नष्ट होण्याऐवजी भांडवलशहांशीसोबत केलेल्या मैत्रीचे नवेच रुप धारण केले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जाहीरनाम्यामधून टिका केली आहे. तसेच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राफेल खरेदी व्यवहाराने देशाच्या विवेकबुद्धीला हादरे दिले आहेत असेही दिलीप वळसे पाटील जाहीरनाम्या दरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे या जाहीरनाम्याच्या कव्हर पेजवर आओ मिलके देश बनायें हा विषय घेण्यात आला आहे तर दुसर्‍या टॅगलाईनमध्ये
जातीधर्म, भाषा, प्रांत एकत्र घेवून ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. शिवाय शेतकरी, युवा, महिला हा केंद्रबिंदू ठेवण्यात हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

चार वर्षात कृषी क्षेत्राच्या सरासरी वार्षिक जीडीपीतील वाढ फक्त २.५ टक्के आहे. वाढीचा हा दर युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षात ५.२ टक्के इतका मंदावला आहे. कर्जबाजारीपणा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि शेतमालाला पुरेशी किंमत न मिळाल्याने शेतकरी समुदायावर कुर्‍हाड कोसळली आहे. राष्ट्रवादी कृषीक्षेत्र विकासाकडे, उत्पादकता, उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता वाढविण्यासाठी पुरेसे लक्ष देणार आहे. शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यात येईल शिवाय देशातील सर्व शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिले आहे.

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात या योजनावर आधारीत

याशिवाय आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर भर, कामगार कायद्यात सुधारणा, कर सुधारणा, मानव संसाधन विकास, आरोग्याचा हक्क, महिला व बाल कल्याण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरीक, परराष्ट्र धोरण, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, लोकशाही संस्थांची चौकट बळकट करताना, मनरेगा, जल आणि सिंचन विकास, उत्पन्नातील असमानता या विषयावर भर देण्यात येणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या २३ सदस्यांनी चार बैठका घेऊन हा जाहिरनामा तयार केला आहे. जाहिरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,डॉ. समीर दलवाई, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, सुधीर भोंगले,प्रवक्ते महेश चव्हाण उपस्थित होते.

Related posts

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालय आज दुपारनंतर देणार निर्णय

News Desk

तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही !

News Desk

विधान परिषद निवडणूकीत बसपाचे समर्थन करणार | अखिलेश यादव

News Desk