नवी दिल्ली | “ज्याप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांनी देशाला एका प्रवाहात आणले. मोदी हे तसाच करिश्मा असलेले नेते आहेत”, या शब्दांत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे ३० मे रोजी पार पडणाऱ्या नरेंद्र मोदीच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याचे देखील रजनीकांत यांनी सांगितले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना देखील यावेळी शपथ दिली जाईल.
रजनीकांत हे चेन्नईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “भारताला नरेंद्र मोदी यांच्या रूपात एक नवे नेतृत्व मिळाले. गेल्या ५ वर्षांत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे. या देशाच्या जनतेचे भविष्य आता त्यांच्या हातात आहे”, अशा शब्दात रजनीकांत यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. सध्या संपूर्ण देशात मोदी लाट असल्याचेही रजनीकांत यांनी म्हटले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या बाजूने कौल देऊन त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. त्यानंतर एनडीएची सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरु झाली. दिल्लीत शनिवारी (२५ मे) एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिले. नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी म्हणजेच ३० रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता मोदींचा शपथविधी सोहळा पार पडेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.