HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात भरत गोगावलेंचे विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे तक्रार

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशात बोलवण्यात आले आहे. विधानसभेत आज (3 जुलै) विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी शिवसेनेच्या वतीने प्रतोद म्हणून भरत गोगावले व्हीप जारी केली होती. परंतु, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या प्रतोद भरत गोगावले यांच्या व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या 16 आमदारांविरोधात तक्रार केली आहे. यात शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. यासंदर्भात गोगावलेंनी विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्राद्वारे तक्रार केली असून अध्यक्षांनी सभागृहात गोगावलेंच्या पत्राचे वाचन केले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिंदेंनी पक्षविरोधात बंड पुकारला. शिंदेंसह 39 आमदारांनी पक्षाविरोधात बंडखरी करत सुरतमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले होते. यानंतर शिंदेंनी सुरतमधील मुक्काम हलवित गुवाहाटीमध्ये आठवड्याभरात वास्तव्यात होते. यानंतर शिवसेनेचे 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. शिंदे गटांनी ते शिवसेनेचे असल्याचा दावा बंडखोरी केल्यापासून केला आहे. शिवसेनेने काल (3 जुलै) शिंदेंना गट नेते पदावरून हक्कालपट्टी केली.

विधानसभेच्या अध्यक्ष पदी राहुल नार्वेकरांची निवड

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांना 164 मतांनी विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते मिळाली आहे. यामुळे राजन साळवींचा पराभव झाला आहे.  समाजवादीचे अबू आझमी, एमआयएमचे दोन आमदार यांनी तटस्थ राहिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. तर तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले.

संबंधित बातम्या
राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील विधानसभेचे तरुण अध्यक्षपदी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार ?

News Desk

गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यलयाजवळ बॉम्ब असल्याचा निनावी फोन

News Desk

भारतीय क्रिकेट टीमचे दिग्गज फलंदाज निवडणुकीच्या पिचवर

swarit