HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

झेपत नसेल तर खुर्ची खाली करा, मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीवर राणेंची बोचरी टीका

मुंबई | “काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की ह्यांना सुट्टी घ्यावी लागली ? झेपत नसेल तर खुर्ची खाली करा”, अशा अत्यंत बोचऱ्या शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ३ दिवसांच्या सुट्टीवरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजपासून (३१ जानेवारी) तीन दिवसांच्या सुट्टीवर आहेत. हे तीन दिवस ते महाबळेश्वरच्या खाजगी दौऱ्यावर असणार आहेत. त्याचप्रमाणे, महाबळेश्वर येथील कीज रिसॉर्टमध्ये १ फेब्रुवारीला रोजी होणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“मी १९९५ पासून ते २०१९ पर्यंत ६ मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास ३ महिने झाले आणि उद्धव ठाकरे ३ दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की ह्यांना सुट्टी घ्यावी लागली. झेपत नसेल तर खुर्ची खाली करा”, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. खरंतर, राणे-ठाकरे घराण्यातील संघर्ष हा संपूर्ण राज्याला चांगलाच माहिती आहे. त्यातच, भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निलेश राणे हे त्यांच्यावर वारंवार अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरेंची प्रशासकीय धावपळ सुरु असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. दरम्यान, या सर्व कार्यक्रमांतून वेळ काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवसांसाठी महाबळेश्वरला खासगी दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा मुक्काम महाबळेश्वर येथे असून ते राजभवन या शासकीय निवासस्थानी राहणार असल्याची माहिती मिळते. वेण्णालेक पठारावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असून त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी याठिकाणी दाखल झालेत.

Related posts

राज्यात ४४ लाख बोगस मतदार, प्रदेश काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

News Desk

मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार | मुख्यमंत्री

News Desk

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

News Desk