HW News Marathi
राजकारण

निरंजन डावखरे भाजपाच्या वाटेवर

मुंबई | कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. डावखरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पक्षांतर्गत असलेल्या वादाला कंटाळून ते भाजपात जात असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. येत्या निवडणुकीत त्यांना आमदारकी मिळावी म्हणून त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

डावखरेंनी भाजपात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. निरंजन डावखरे हे वसंत डावखरे यांचे राजकीय वारसदार आहेत. वसंत डावखरे हे शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जायचे. सोबतच डावखरे यांचे सर्वपक्षीयांसोबतच शिवसेनेशी उत्तम संबंध होते. जानेवारी 2018 मध्ये वसंत डावखरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे निरंजन डावखरे राजकारणात सध्या एकाकी पडले आहेत. दरम्यान, जुलै 2012 मध्ये ते कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. येत्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी डावखरेंसारख्या नेत्याची भाजपाला गरज असल्यामुळे येत्या काळात डावखरेंसारख्या नेत्याची गरज असल्यामुळे डावखरे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

नरेंद्र मोदी ३० मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

News Desk
राजकारण

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे म्हणता म्हणजे शंकेची पाल चुकचुकतेच !

News Desk

मुंबई । कार्तिक एकादशीला काहीजण पाऊस पडू दे म्हणतात. परंतु सभागृहनेते चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच शंकेची मनात पाल चुकचुकू लागली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे जो अहवाल असेल तो पटलावर ठेवावा. जर ठेवला नाही तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला दिला आहे.

आमची सर्व विरोधी पक्षाची भूमिका हिच आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मागास आयोगाने ज्या शिफारसी दिल्या आहेत. त्या मुख्यमंत्र्यानी स्पष्टपणे वाचून दाखवल्या नाहीत. मागास आयोगाच्या शिफारसी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली. २९३ चा प्रस्ताव हा सरकारचा अभिनंदन करणारा आहे. परंतु आमचा त्याला विरोध आहे. फिल्डवर ज्या अडचणी लोकांना येतात ते वास्तव आम्हाला सभागृहामध्ये मांडायचे आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु त्यामध्ये अनेक तालुक्यांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यासर्व गोष्टी आम्हाला सरकारच्या लक्षात आणून द्यावयाच्या आहेत. आज सकाळपासून आम्हाला सभागृहामध्ये ही चर्चा करायची होती परंतु मुख्यमंत्री सभागृहात आलेले नाहीत. हे आमच्या डोक्यावर यांचे खापर फोडतील म्हणून आम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजेत. त्यामुळेच मी सभागृहात वक्तव्य केल्याचा खुलासा अजितदादा पवार यांनी केला.

मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे…

सभागृहामध्ये नुसती वांजोळी चर्चा करून काही फायदा नाही. मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे. आम्ही म्हणतोय टीसचा अहवाल पटलावर ठेवा. त्यामुळे त्यात काय आहे ते तरी कळेल. धनगड आहे की धनगर आहे हे तो अहवाल समोर आल्यावर कळणार आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

Related posts

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

Aprna

“अरे मी बाहेर वॉशरूमला गेलो…”, नाराजीच्या चर्चेवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Aprna

“…मी दुसरी शिवसेना मानत नाही”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Aprna