HW News Marathi
राजकारण

नितीन गडकरी यांनी विकासकामांची यादी कृष्णकुंजवर पाठवली

मुंबई | केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विकासकामांची भली मोठी यादी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पाठवली आहे. या यादीत नितीन गडकरी यांनी पुर्ण झालेली कामे, सुरु असलेली कामे, हाती घेण्यात येणारी कामे अशा सर्व कामांची माहिती असलेली यादी पाठवण्यात आली आहे.

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली होती. की, ‘नितीन गडकरी हे सरकारी योजनाबाबात वाटेल ते आकडे सांगतात.

VIDEO: ( राज ठाकरे गडकरींबद्दल बोलले तो व्हिडीओ 17:14 ते 18:58 यादरम्यान पाहा)

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/438562553243880/

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

नितीन गडकरी कुठेही भाषणा गेले की, साबणाच्या पाण्याचे फुगे सोडल्याप्रमाणे हिशेब सांगतात. इतके कोटी खर्च केले, तितके लाख खर्च केले, असं गडकरी म्हणतात. पण पैसेच नाहीत तर खर्च कसा करता, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित करत, खिल्ली उडवली होती.

साबणाची बाटली असते आणि त्यात बुडवून फुगे सोडतात, तसं नितीन गडकरी कुठेही गेले की 1 लाख कोटी, फू…..2 लाख कोटी फू.. करतात. पण पैसे आले कुठून? ते आले की तुम्ही (जनतेने) करा फू… असं राज म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळी पहाट कार्यक्रमाला पूर्व उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : बी. जी. कोळसे पाटील वंचित बहुजन आघाडीतून बाहेर

News Desk

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता भासू शकते !

News Desk