HW News Marathi
राजकारण

युती तोडायची कि नाही अन् कुणाशी करायची हा शिवसेनेचा अधिकार !

मुंबई | महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवसपूर्वी म्हणजेच आज (७ नोव्हेंबर) थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. “युती तोडायची कि नाही. तसेच कुणाशी युती करायची हा शिवसेनेचा अधिकार”, असे नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटले आहे.

नितीन गडकरींची प्रतिक्रिया ?

  • अजूनही चर्चा होऊ शकते
  • ज्यांच्या जागा अधिक त्यांचाच मुख्यमंत्री हेच धोरण
  • भाजप-शिवसेना युती सर्वात दीर्घकालीन
  • युती तोडायची कि नाही हा शिवसेनेचा अधिकार
  • कुणाशी युती करायची हाही शिवसेनेचा अधिकार
  • मुख्यमंत्रीपद वाटून देण्याबाबत कोणतीही चर्चा नाही.
  • उद्धव ठाकरे म्हणतात, आमच्याकडे अन्य पर्याय उपलब्ध
  • अडीच वर्षांचा शब्द भाजपने दिला नव्हता
  • ‘नंतर बोलू’ याचा अर्थ आश्वासन नव्हे
  • मध्यस्थी करायची माझी तयारी आणि इच्छाही
  • भाजप-शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने डावलल्याने जानकर नाराज, रासपच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

News Desk

‘ये दोस्ती आगे भी चलती रहेगी’, तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna

शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदींनी महात्मा गांधी, वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन

News Desk